येळदरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे संजय माने यांचा दणदणीत विजय. सर्वाना न्याय देणार उपसरपंच माने चे विधान.

दिव्यराज न्युज जत:- येळदरी ता.जत येथे उपसरपंच निवडीमध्ये काँग्रेसचे धुवा उडवत राष्ट्रवादीचे संजय माने यांचा दणदणीत विजय.                                             गेल्या पंचवार्षिक निवडणुकित काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी असा सामना झाला होता. यामध्ये काँग्रेसचे ६ व राष्ट्रवादीचे ३ उमेदवार निवडून आले व काँग्रेसचे ६ उमेदवार निवडून आल्यामुळे सरपंच पद हे काँग्रेसने पटकाविले. परंतु उपसरपंच पदासाठी काल निवडून झाली. यामध्ये काँग्रेस तर्फे मीनाबाई वाघमारे यांनी अर्ज भरले होते व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस कडून विजय माने यांनी अर्ज भरले होते यामध्ये राष्ट्रवादीचे विजय माने यांनी  ९ पैकी ७ मते मिळवून विजय खेचून आणले.                             हे चमत्कार कसे झाले हे कळाले नाही असे मत येळदरी येथील नागरीकांनी "दिव्यराजशी" बोलताना  करत होते. निवडून होऊन दोन वर्षे होत आले एवढे लवकर सत्ता बदल कसा असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.                   यावेळी भगवंत माने, विरभद्र  कांबळे, अवानाश वाघमारे, सुभाष सरगर, ग्रा.प सदस्य  प्रकाश सरगर, ग्रा.प सदस्य प्रशांत माने गुजर, मारूती माने, राजू सरगर, आंनदराव उतरे संचालक सोसायटी , विलास सरगर, तुकाराम माने मा. उपसरंच, सिद्राया माने, सांगापा पाटील, सुरज सरगर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.