के एम हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज जतच्या दोन खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- के एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कु. तूबाफातिमा शेख - लांबउडी - द्वितीय क्रमांक , व कु. श्रुती कोकरे - 1500 मीटर धावणे - द्वितीय क्रमांक या दोन खेळाडूंचे मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
सांगली जिल्हा ऍम्युचरअथलेटिक असोसिएशन सांगली मार्फत 23 जुलै 2022 रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उज्वल यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या गुणवंत खेळाडूंना प्रशालेचे मुख्याध्यापक सोलापुरे सर, पर्यवेक्षक कंगोणी, सर प्राध्यापक भूषण माने सर, यांचे प्रोत्साहन लाभले व क्रीडा शिक्षक विजय बिराजदार सर यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडू दिव्यराजशी बोलताना म्हणाले की विजय बिरादार सरांनी अथक प्रयत्न केल्यामुळेच हा विजय मिळाला आहे.
Comments
Post a Comment