गरिबांना रेशनचे धान्य चांगल्या दर्जाचे मिळावे :-प्रहार संघटनेची अध्यक्ष सुनिल बागडे यांची मागणी


दिव्यराज न्युज जत :-  रेशन धान्यात कचरा व अळ्या सापडण्याचे प्रमाण वाढले आसल्यामुळे  गरिबांना रेशनचे धान्य चांगल्या दर्जाचे मिळात नाही त्यामुळे गरीबांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळावे यासाठी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल बागडे यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
    निवेदनामध्ये म्हटले आहे की, रेशनचे धान्य घेणारे सर्वसामान्य नागरिकांना धान्य पुरवठा होत असताना चांगल्या दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत नाही. रेशनचे धान्य खाणारे नागरिक हे सुद्धा माणसेच आहेत, याची जाणीव सरकारने ठेवायला पाहिजे. गोरगरिबांनी काय पाप केले त्याला कधी कधी धान्य इतके निकृष्ट मिळते सडलेला गहू दिला जातो. गोरगरीब माणूस म्हणून जगायचे नाही का असा प्रश्न पडतो.  तांदूळ व गहू चांगल्या दर्जाचा उपलब्ध करून सदरचे धान्य वाटप होत असताना पारदर्शकपणे त्याचे वजन करून सर्वसामान्य नागरिकांना धान्य द्यावे. त्यामध्ये कुठलीही काटा मारी होऊ नये, गोरगरीब नागरिकांचे महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे. त्या नागरिकांना चांगले धान्य देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. यापुढे कुठल्याही नागरिकांना रेशनचे धान्य चांगल्या पद्धतीचे न मिळाल्यास त्यांनी प्रहार संघटनेकडे तक्रारी द्याव्यात अशी आवाहान बागडे यांनी केली आहे.                                             ते म्हणाले  आम्ही गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू. रेशनचे धान्य घेणारे नागरिक सुद्धा माणसे आहेत याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. सडके धान्य देऊ नये, जनावरां सारखी वागणूक गोरगरिबांना देऊ नये,भारताचे नागरिक म्हणून त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी लागणारे धान्य चांगल्या दर्जाचे द्यावे उपलब्ध करून देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.

Comments