माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.
दिव्यराज न्युज जत :- जतचे माजी आमदार कै. उमाजीराव सनमडीकर यांच्या ८४ व्या जयंती निमित्त जत येथील कमल ऑथोपेडीक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे मार्फत भव्य सांधेरोपण तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर दि.२२ जून ते ६ जुलै रोजी पर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली.
सांधेदुखी व गुडघेदुखी यासाठीच खास शिबीर घेण्यात आले आहे. गुडघेदुखी, खुब्यांचा आजार,यावर इलाज आहे. गुडघ्यांच सांध्यांच आयुष्य वाढवू शकतो आणि "इलाजही" तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना गुडघा व खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. मोफत एक्स- रेची सोय केली जाणार आहे. तसेच तज्ञ डॉक्टर डॉ. ओंकार कुलकर्णी, डॉ. विक्रांत मगदुम, डॉ. सात्विलकर जफर हे तपासणी करणार आहेत. हे शिबीर २२ जुन २०२२ ते ६ जुलै अखेर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत १५ दिवस कमल ऑर्थोपेडीक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ठेवले आहे.
Comments
Post a Comment