तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कु.वैष्णवी धर्मा देवकर प्रथम.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत - जत शहरातील के एम हायस्कूल व जुनियर कॉलेज जत येथे इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. वैष्णवी धर्मा देवकर या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन रेन डिटेक्टर हा यशस्वी उपक्रम राबवून तालुकास्तरीय स्पर्धमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीला के एम हायस्कुलचे मुख्याध्यापक सोलापुरे व पर्यवेक्षक श्री कंगोनी व वर्गशिक्षक पाटील मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले
Comments
Post a Comment