सांगली जिल्हा परिट समाज जनगणना मोबाईल ॲपचे उद्घाटन.कार्यअध्यक्ष संजय साळुंखे यांची माहीती.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत ;- महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ, सांगली जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग सांगली येथे संपन्न झाली. यावेळी सांगली जिल्हा परिट (धोबी) समाज जनगणना मोबाईल ॲपचे उद्घाटन जिल्हा ओबीसी व्हीजीएनटी संघटनेचे अध्यक्ष सुनील गुरव सर, परीट समाज जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंखे व जिल्हा कार्यकारिणी तील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या मिटींगचे स्वागत प्रस्ताविक माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले.
या ॲप लिंकद्वारे आपली कौटुंबिक माहिती भरल्यास सांगली जिल्ह्यातील तालुका व गाव शहर वाईज परीट समाज बांधवांची लोकसंख्या कळण्यास मदत होईल. जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी आपली माहिती या लिंक वर जाऊन भरावी जनगणनेस सहकार्य करावे व आपण सांगली जिल्ह्यातील परिट समाज बांधवांना हि माहिती भरण्यास सांगावी असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंखे केले.
सांगली जिल्हा ओबीसी व्हीजीएनटी संघटनेचे अध्यक्ष सुनील गुरव यांनी परिट समाज बांधवांनी मंगळवार 3 सप्टेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी समाज एक दिवसीय उपोषणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले. तसेच ऑनलाईन द्वारे महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार यांनी उपस्थिती दर्शवली व शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रवि यादव यांची शिराळा तालुका ओबीसी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व
नुतन कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील समाज बांधवांनी कामाची माहिती दिली. या मिटींग साठी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष कुमार गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख रवी यादव (शिराळा), युवा अध्यक्ष रोहन परीट,राजेंद्र पावसे, बबनराव शिंदे, महिला अध्यक्ष शर्मिलाताई शिंदे, राज्यस्तरीय सदस्य सुमनताई परीट, सूर्यकांत परीट, सुनिता ह. राक्षे, शोभाताई साळुंखे , जयश्रीताई गायकवाड ,साधना चन्ने, सुर्यकांत परीट दिपक राक्षे, विनायक शिंदे, महेश परीट , दिपक गायकवाड, दिगंबर साळूंके, सुनिल कदम, तसेच जिल्हा व तालुका कार्यकारणी सदस्य महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment