जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी :- (राजू ऐवळे) डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्च' चे विद्यार्थी सोहन श्रीमंत ठोंबरे यांना पदार्थविज्ञान या विषयातून विद्यापीठाकडून पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. सोहन ठोंबरे यांनी पदार्थविज्ञान विद्याशाखेतून 'सिन्थेसिस अँड कॅरॅक्टराइडोशन ऑफ सिलिकॉन अँड कार्बन बेस्ड ऍनोडेस फॉर लिथियम आयन बॅटरीझ' या विषयावरील प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. मनीषा फडतरे आणि रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. चंद्रकांत लोखंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. सोहन या विद्यापीठातील लिथियम आयन बॅटरी विषयामधून पीएच. डी. करणारे प्रथम विद्यार्थी आहेत. त्यांच्या संशोधनानुसार पुढील कालावधीमध्ये बॅटरीसाठी लागणारी सिलिकॉन अँड सिलिका हि सामग्री तयार करण्यासाठी तांदळाचा टाकाऊ भुसा चा वापर करून त्याचा वापर हा ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी लिथियम आयन बॅटरी आणि लिथियम आयन कपॅसिटर मध्ये ऍनोडे सामग्री म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे बॅटरी ची आयन साठवण्याची क्षमता वाढेल व बॅटरी खूप वेळ चालेल. त्याचबरोबर जत येथील राजे रामराव कॉलेज चे प्राचार्य, सुरेश पाटील आणि माजी प्राचार्य डॉ विठ्ठल ढेकळे, पदार्थविज्ञान विषयाचे विभागप्रमुख डॉ. अप्पासाहेब भोसले, डॉ. श्रीकांत कोकरे, वनस्पतिशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. शंकर सौदागर, डॉ. भोसले आणि विवेकानंद कॉलेजचे पदार्थविज्ञान विषयाचे विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठ यांनी सोहन याला सिन्थेसिस साठी आर. आर. कॉलेजची रिसर्च लॅब उपलब्ध करून दिली व मार्गदर्शन केले. सोहन यांना सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेकनॉलॉजि (सी-मेट) पुणे येथील शात्रज्ञ डॉ. रामचंद्र कलुबर्मे आणि शात्रज्ञ डॉ. भरत काळे सर यांचे लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी खूप सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर हे संशोधन करत असताना सोहन ठोंबरे यांची स्टुडन्ट एक्सचेंज मधून डॉ. मनीषा फडतरे, श्री. रोहन पाटील, डॉ. हॅकन ऑलिन यांनी एक महिन्यासाठी ग्रीन सुपरकॅपॅसिटर तयार करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ न्याचरल सायन्स, मिड स्वीडन युनिव्हर्सिटी, सुन्दस्वल, स्वीडन येथे निवड केली होती. त्यांच्या संशोधनासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठ, भारत आणि मिड स्वीडन युनिव्हर्सिटी, स्वीडनच्या इंटरनॅशनल कॉलॅबोरेशन मधून त्यांना द स्वीडिश फॉउंडेशन फॉर इंटरनॅशनल कोऑपरेएशन इन रिसर्च, हायर एज्युकेशन-एसटिआइएनटी, स्वीडिश इनर्जी एजेन्सी, इयू रिजनल फंड आणि के के फॉउंडेशन ह्या पाच स्वीडिश एजेन्सीचे फंडिंग मिळाले. या यशाबद्दल त्यांचे जत येथील राजे रामराव कॉलेज चे प्राचार्य, सुरेश पाटील आणि माजी प्राचार्य डॉ विठ्ठल ढेकळे, माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. श्रीमंत ठोंबरे, पदार्थविज्ञान विषयाचे विभागप्रमुख डॉ. अप्पासाहेब भोसले, डॉ. श्रीकांत कोकरे, वनस्पतिशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. शंकर सौदागर, डॉ. भोसले आणि विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य, डॉ. रमेश कुंभार, पदार्थविज्ञान विषयाचे विभागप्रमुख डॉ. संजय लट्ठे, माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एम. जी. गायकवाड व प्रा. किरण पाटील, आणि कॅप्टन अभिजित मस्कर, सौ. मंगल ठोंबरे, सौ. मेधा ठोंबरे, निहारिका ठोंबरे यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

सांगली कृ.उ.बा.स. निवडणुकीत भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही.भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांचा भाजपला घरचा आहेर!

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीची गरज: - डॉ. मधुकर बाचुलकर

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.