जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी :-(राजू ऐवळे)संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन रजिस्ट्रेशन दिल्ली शाखा जत यांचे वतीने रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असलेची माहिती संयोजकानी दीली
     सारी सृष्टी एका प्रभु परमात्म्याची निर्मीती आहे सर्वांचा देव परमात्मा एक आहे आणि तो सर्वांच्या घटामध्ये विराजमान आहे मानवाची सेवा‌ हीच ईश्वराची सेवा होय या समयाच्या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे शिकवणीनुसार आध्यात्माबरोबर रक्तदान शिबीर वृक्ष लागवड,आरोग्य शिबीर,स्वच्छता अभियान,आपत्तीग्रस्तांना मदत कार्य पुरविणे यासारखे सामाजिक उपक्रम राबऊन मानवाची सेवा करीत आहेत.रक्तदान शिबिराची सुरवात सन १९८६ साली तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी पहिल्यांदा स्वता रक्तदान करुन केली आतापर्यंत जवळजवळ १३,८१,९०६ युनिटहुन अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविलेला आहे वैज्ञानिकांनी सर्व गोष्टींमध्ये प्रगती केली पण विज्ञानाला रक्त तयार करता आले नाही म्हणून रक्तदान केले पाहिजे रक्तदानाने एखाद्याचे प्राण वाचु शकते एखाद्याला जीवनदान मिळु शकते म्हणुन २६ मे रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिरात सर्वांनी मानवतेच्या महान कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे व सेवादल संचालक संभाजी साळे यांनी केले.
      रक्तदानाच्या प्रति जनजागृती करण्यासाठी निरंकारी भक्तांनी आज जत शहरात एक बाईक रॅली देखील काढली ज्यामध्ये सुमारे ५० हुन अधिक भक्तगण सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.