जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेला १ कोटी १ लाख ढोबळ नफा

 दिव्यराज मराठि जत प्रतिनिधी:- जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये १ कोटी १ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. मल्लिकार्जुन इटंगी यांनी पत्रकार बैठकीत दिली. चेअरमन इटंगी म्हणाले, ३१ मार्च २०२२ अखेर रूपये २३ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय झाला आहे. एकूण ठेवीमधे रुपये. २ कोटी नी वाढ होऊन, ३१मार्च २०२२अखेर पतसंस्थेच्या एकुण ठेवी रूपये ११ कोटी १९ लाख इतकी असून, ठेवी वाढण्याचे प्रमाण २२ % इतके आहे. एकूण कर्जे ११ कोटी ११ लाख. इतकी आहेत. संस्थेचे वसूल भागभांडवल रुपये. ६० लाख इतके असून, राखीव व इतर सर्व निधी ४ कोटी ९३ लाख आहे. एकूण गुंतवणूक ४ कोटी ९१ लाख इतकी  केलेली आहे. संस्थेच्या पोटनियमा नुसार कराव्या लागणाऱ्या सर्व तरतुदी व इतर सर्व खर्च वजा जाता शिल्लक निव्वळ नफा रुपये ५६ लाख २४ हजार इतका झाला असून, चालू वर्षी संस्थेला  थकीत कर्जाची वसुली चांगली झाल्यामुळे एन पी ए  शुन्य % राखण्यात यश आले आहे. पतसंस्थेचे स्वमालकीची जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य दिव्य अशी स्वतःची ईमारत  आणि स्वतःचे स्ट्राँग रूम व लॉकर सुविधा आहे. संस्थेमध्ये इतर बँके प्रमाणे, सीबीएस  सॉफ्टवेअर सिस्टीम चालू करून सभासदांना आणि ग्राहकांना कमीत कमी वेळेत खात्यावरील रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे देशात कुठेही, पैसे पाठवणेची सोय व्हावी याकरिता आर टी जीएस व एन ई एफ टी सुविधा चालु केली आहे. तसेच सभासदांना प्रती वर्षी १० % प्रमाणे डिव्हीडंड दिलेला  असून,  संस्थेला प्रत्येक वर्षी सतत ऑडिट वर्ग "अ " मिळालेला आहे. जागतिक पातळीवर कोरोनामुळे संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले असताना देखील संस्थेने  लॉक डाऊन, व जागतिक मंदीच्या काळातही   संस्थेने आपल्या सभासदांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी ग्राहकांना कमीत कमी वेळेत संस्थेच्या व्यवहाराच्या खास करून सोने गहाण कर्ज कमीत कमी व्याज दराने  सुविधा  उपलब्ध करुन देत आहेत. संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी खर्चामध्ये बचत, काटकसर, प्रामाणिक व पारदर्शक कामकाज करून संस्थेला उच्च शिखरावर विराजमान करण्याचं प्रयत्न करीत आहेत. यावेळी संस्थेचे सभासद व हितचिंतक, कर्जदार सर्वांनी भरपूर सहकार्य केल्याने, चांगला व्यवसाय आणि विक्रमी नफा झाला आहे.  आणि यापुढे ही पतसंस्थेच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत , कमी व्याज दराने कर्ज पुरवठा व  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे म्हणाले. यावेळी संस्थेचे चेअरमन, श्री.मल्लिकार्जुन इटंगी , बसवराज हिट्टी, मोहन माळकोटगी, चंद्रशेखर संख, बसवलिंग कल्याणी, शैलेश ऐनापुरे, सागर बामणे, महादेवी का ळगी, सुलोचना हत्ती, वर्षाताई संकपाळ, व्यवस्थापक सुनील जेऊर,  आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन