आजच्या काळात आरोग्य जपणे ती तपासने काळाची गरज आहे - डाँ कैलास सनमडीकर
दिव्यराज जत प्रतिनिधी :- आजच्या काळात आरोग्य जपणे ती तपासने काळाची गरज आहे असे मत डाँ कैलास सनमडीकर यानी संख येथे आरोग्य तपासनी कार्यक्रामात बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु माहागाईच्या काळात सर्वांनाच आरोग्य तपासणी करणे शक्य होत नाही. तसेच तपासणीसाठी लागणारा खर्च सामान्य माणसाला परवडणारी नाही. म्हणून हीच सामाजिक बांधीलकी जपत आज दिनांक. 10-04-2022 रोजी श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, जत संचलित कमल आर्थोपेडिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जत आणि डाँ राजेंद्र झारी यांचे हिराई हॉस्पिटल जत यांच्यावतीने संख येते मा.डॉ.आर.के.पाटील सर यांचे नातू कु.साहिल पाटील याच्या 21 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मा. डॉ.आर.के पाटील सर, ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. कैलास सनमडीकर सर, डॉ.राजेंद्र झारी सर, डॉ. के.प्रसाद सर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मणके व सांध्यांचे विकार, हाडांची तपासणी, हृदरोग, किडणी विकार, अनियंत्रीत रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन ची तपासणी अश्या अनेक आजारावर मोफत निदान व उपचार करण्यात आले. या कार्यक्रमास संख मधील शेकडो ग्रामस्थानी याचा लाभ घेतला. शिबीर पार पाडण्यासाठी संतोष कांबळे,अमजद मकानदार,जी. बी. हायस्कूल मधील कर्मचाऱ्यानी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment