भारत देश कृषीप्रधान देश नसून जातीप्रधान देश आहे- आयु. आशोक आगावने
दिव्यराज जत प्रतिनिधी:- आंबेडकर नगर जत येथे आज दुसरे पुष्प आयु. आशोक आगवणे सर यांनी गुपंले. ते म्हणाले हा देश जाती प्रधान देश आहे . माणुस कोणत्या जातित जन्मला यावरुन तो कोण आहे ठरविले जाते. भारत देश कृषी प्रधान देश नसून जाती प्रधान देश आहे. जाती व्यवस्थेमुळेच शुद्र अशुद्र व्यवस्था निर्माण झाला. खंडोबा हे देव नशून एक खंड सांभाळणारा आमचा पुर्वज होता आमच्या अज्ञानाने त्याला देव करुन ठेवले. मसोब हा महशूल संभाळणारा, मार्तंड म्हणजे तोंडांवर वार करणारा होता त्या महान पुरूषानां देव करुन ठेवले त्यामुळे आज ६००० जाती तयार झाले हे सर्व सडयंत्र रचले गेले. म्हणून जाती व्यवस्था बंद करुन समानता यावा असा प्रयत्न आमचे सर्व फुले, शाहु, आंबेडकर हे आमचे महापूषानी केली . शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही शिक्षण घेतलेला माणुस कधीच गप्प बसत नाही. म्हणून डाँ बाबासाहेब आबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघीनीच दुध आहे जो ते पितो तो गुलाम राहणार नाही . या जाती व्यवस्थेने शिवाजी महाराज शुद्र आहेत असे भासवून त्यांचा राज्याअभिषेक नाकारले म्हणून त्यानां पायाचे डाव्या अंगठाने ठिळा लावण्यात आले. जाती व्यवस्था हि आज मुख्य समषा बनली आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप, उपनगराध्यक्ष आपासो पवार, संजय कांबळे, बंडू कांबळे, अमोल साबळे, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, नगरसेवक प्रकाश माने, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, अविनाश वाघमारे, शंकर वाघमारे सर, व मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment