संत निरंकारी मिशनच्या वतीने जालीहाल बुद्रुक येथे स्वच्छता अभियान संपन्न.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधि :- संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या माध्यमातून जालीहाल बुद्रुक , करजगी, बेळोंडगी, येथील निरंकारी भक्तांनी एकत्रित येऊन जालिहाळ येथे स्वच्छता अभियान राबविले या अभियानामध्ये लहानापासून मोठ्याने उत्साहात सहभाग घेतला. जालिहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा तसेच गाव परिसरात स्वच्छता करण्यात आली अभियान सुरु असताना गावचे सरपंच पांडुरंग भोसले ग्रामपंचायत सदस्य राजाप्पा बिराजदार,भिमराव चव्हाण,दत्तात्रय जाधव, आप्पासो जाधव, यांनी भेट देऊन या निस्वार्थ पणे राबवित असलेल्या अभियानाचे कौतुक केले
निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे ब्रह्मज्ञानाद्वारे एका प्रभु परमात्म्याची ओळख करून देऊन मानवाला मानव प्रिय असावा एकमेकांचा आधार बनावा,सर्वाच्या ह्रदयामध्ये एकाच प्रभु परमात्म्याचा अंश आहे देव हा निर्गुण निराकार आहे आणी तो सगळीकडे व्याप्त आहे मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे अशी निष्काम भावनेने केलेली सेवा ही ईश्वराला प्रिय असते या विश्वबंधुत्वाच्या शिकवणीमुळे आम्ही सर्वजन एकत्रित येऊन हे अभियान राबवित आहे या अभियाना बरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर,वृक्षलागवड,कोरोणा कालावधीत सत्संग भवन कोविड सेंटर साठी देण्यात आले , कोविड सेंटर मध्ये मोफत भोजन व्यवस्था,नैसर्गिक आपत्ती वेळी मदत करणे यासारखे अनेक सामाजिक कार्य मंडळामार्फत देशामध्ये व विदेशामध्ये राबविण्यात येतात अशी माहिती जालिहाळ येथील मंडळाचे स्थानिक प्रबंधक संभाजी भोसले यांनी दिली गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम भोसले यांनी निरंकारी निशनच्या शिकवकीची आज समाजाला गरज आहे ही जर शिकवण सर्वानी अंगिकारली तर जगामध्ये विश्वबंधूत्व निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असे उदगार काढले
Comments
Post a Comment