जिल्हा परिषेद मराठी शाळा मेंढेगिरी येथे संस्कृतीक कार्यक्रम संपन्न.
दिव्यराज न्युज प्रतिनिधि:- १४ एफ्रिल डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी जिल्हा परिषेद मराठी शाळा मेंढेगिरी येथे संस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला. महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३१ वा जयंती अती उत्साहात पारा पडला. यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेमधील विध्यार्थानी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. यामध्ये स्पेशल भिमगिते, कन्नड गिते, लावणी, सिनेमातिल गिते यावर विध्यार्थानी डान्स केले व मनोरंजन करण्यासाठी नाटकही केले. या सर्व कार्यक्रमास गावकर्यानी भरभरुन प्रतिसाद दिले तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे केले. मराठी शाळेतील विध्यार्थानी आलेले सर्व गावकर्याना ३ तास मंत्रमुग्ध केले. मुलांनी कार्यक्रम खुप छान केले असल्याची प्रतिक्रियाही दिव्यराजशी बोलताना दिली. हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यपक कुलकर्णी मँडम, कुंभार मँडम, माजी उपसरपंच श्रीदेवी कट्टीमनी, सुजित कांबळे, शंकर केगांर यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास मेंढेगिरी गावचे माजी सरपंच व विध्यमान सदस्य प्रकाश पाटील, माजी सरपंच सुभाष बिरादार, उपसरपंच अजित कांबळे, माजी सदस्य विजयकुमार कुरणे, दुध डेअरीचे मालक अनिल कारके, मेंढेगिरिचे पोलिस पाटील लक्ष्मीबाई कांबळे, यल्लवा कांबळे, शाळा व्यवस्थापन समितिचे माजी अध्यक्ष, गंगाराम ऐवळे, विध्यमान अध्यक्ष संजय ऐवळे, चेअरमन कुमार जैन, केद्र प्रमुख हिरेमठ सर,संभाजी कोडग सर केंद्र प्रमुख जत, गुरूराज कुलकर्णी सर, निवेदक रमेश कोळी सर, गौडापा केसगोंड सर, भाग्यश्री होर्तीकर मँडम, लक्ष्मण कोटलगी सर, रमेश मासळ सर, तसेच आईवडिल, व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
Comments
Post a Comment