वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या सुपरस्टार सर्कसला मदत करा- ह.भ.प तुकाराम बाबा महाराज
दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी:- वादळी वाऱ्याने जत येथे सुरू असलेल्या सुपर सर्कसचे १५ ते २० लाखाचे नुकसान झाले आहे. जतकरांनी सुपर सर्कसला मदत करावी असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटने सुपर सर्कसचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून सर्कसला तातडीने जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम देवून मदत करण्यात आली. रविवारी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी सर्कसल भेट देत सर्कसचे मालक प्रकाश माने यांची भेट घेत त्यांना धीर दिला.
यावेळी बोलताना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, सर्कसचे मालक प्रकाश माने हे मूळचे जत तालुक्यातील माडग्याळ येथील रहिवासी आहेत. अनेक वर्षापासून त्यांनी सर्कस चा हा व्यवसात सुरू आहे. १०० हुन अधिक कलाकार यात काम करतात. कोरोनाच्या महामारीनंतर आपल्या गावातून सर्कसची सुरुवात करावी म्हणून प्रकाश माने यांनी जत येथे सर्कसचा पहिला कार्यक्रम मोठया अपेक्षेने ठेवला पण वादळी वाऱ्याने त्यांच्या सर्कसचे मोठे नुकसान झाले आहे. जत तालुक्यातील सामाजिक संस्थेनी, दानशूर व्यक्तीनी सर्कसला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रुपेश पिसाळ, विवेक टेंगले, आप्पासाहेब सौदागर, बसवराज व्हनखंडे, सूरज मणेर, ओंकार काळे, नबीलाल देशिंग आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment