राजे रामराव महाविद्यालय जत येथे प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी
जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागामार्फत प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी झाली पदार्थविज्ञान विभाग, राजे रामराव महाविद्यालय, जतने सोमवार दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक तास आइनस्टाइन बरोबर या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः अपार कष्ट घेऊन कागदापासून केसाचे टोप तयार केले व आइनस्टाइनच्या वेषात कार्यक्रमास हजेरी लावून आइनस्टाइनने लावलेले शोध विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील, प्रा. महादेव करेनावर, प्रा. डॉ. ए. के. भोसले, डॉ. संजय लठ्ठे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी १०३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. संजय लठ्ठे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. राजाराम सुतार यांनी आभारप्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, संस्थेचे प्रशासन सचिव मा. प्रा. डॉ. राजेंद्र शेजवळ, अर्थसचिव मा. प्रा. सीताराम गवळी, मा. श्रीराम साळुंखे, मा. कौस्तुभ गावडे, राजे रामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील, पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे, डॉ. ए. के. भोसले, डॉ. राजाराम सुतार, प्रा. डॉ. एस. जी. गावडे, प्रा. डॉ. बी. एम. डहाळके, प्रा. अक्षय जुदळे, प्रा. आकाश पासले, प्रा. राजश्री कळाल प्रा. प्रदीप गायकवाड, प्रा. सागर इंगोले, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment