जागतिक सर्जनशीलता आणि नवोपक्रम दिनाचे आयोजन.

दिव्यराज न्युज जत (राजू ऐवळे) :-  जागतिक सर्जनशीलता आणि नवोपक्रम दिना'निमित्त आझादी का अमृत महोत्सवातंर्गत राजे रामराव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत 'रांगोळीतून आकृतीचे प्रदर्शन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अर्थशास्त्र विषयातील सिध्दांत आनेक आकृतीच्या माध्यमातून स्पष्टीकरण केलेले आसून त्या मुलांना लक्ष्यात राहावे म्हणून आपल्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या सिध्दांतातील आकृतीचे रांगोळ्याच्या साहाय्याने प्रदर्शन करून  वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयातील बी.ए. व बी. कॉम. वर्गातील एकूण 91 विद्यार्थी-विद्यार्थीनीने सहभाग नोंदवून विविध आकृतीचे प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.सुरेश एस. पाटील यांनी केले असून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी असे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना विकसित झाले पाहिजे आणि हे निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करून शकतात. समाज व देशाच्या विकासासाठी विद्यार्थी हा विकसित झाला पाहिजे. त्यांच्यात संशोधन वृत्ती विकसित केले पाहिजे आणि यासाठी महाविद्यालयाच्या मार्फत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांन मध्ये कौशल्य विकास करण्याचे प्रयत्न केले जाते. कार्यक्रमाचे प्रस्तावित व नियोजन प्रा.बोगुलवर अशोक तर आभार विभागप्रमुख डॉ. गावडे शंकर यांनी केले असून हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  प्रा. रणदिवे डी. बी.,डॉ.शिवाजी कुलाळ, डॉ. भीमाशंकर डहाळके, प्रा.हिरामण टोंगारे, प्रा.नवले ए. बी., प्रा.  रामदास बनसोडे, प्रा.पुंडलिक चौधरी व महाविद्यालयातील आनेक प्राध्यापकाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन