इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करणारी भाषा :- चंद्रकांत कोळी

दिव्यराज न्युज  जत प्रतिनिधी :- इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असुन या भाषेचे अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करुन देते, असे मत  चंद्रकांत कोळी यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, इंग्रजी भाषा ही जगाचे द्वार असून ती साहित्य, संस्कृती व विज्ञानाचीही भाषा झाली आहे. इंग्रजीमुळेच जग हे एकत्र आले असून त्यामुळे जगाची प्रगती होत आहे. 
         यावेळी इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कु. मालती वाघमोडे, श्रुती कांबळे, कोमल कलढोणे, यास्मिन मुल्ला व प्रियांका बिरडकर यांनी आपल्या भित्तीपत्रिकेचे  सादरीकरण केले. 
   या कार्यक्रमाप्रसंगी इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. रामदास बनसोडे, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. शिवाजी कुलाळ, पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे, प्रा. तुकाराम सन्नके, प्रा.ओमकार कुडाळकर, प्रा.विजय यमगर डॉ.परमेश्वर थोरबोले, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.रामदास बनसोडे, सूत्रसंचालन प्रा. तुकाराम सन्नके तर आभार प्रा.ओमकार कुडाळकर यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.