राज ठाकरेच्या विरोधात आरपीआयचे एक दिवशीय धरणे आंदोलने- जिल्हाअध्य संजय कांबळे
दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- मुस्लिम समाज बांधव हे आपलेच आहे त्यांना संरक्षण ध्या असा आदेश आमचे नेते रामदासजी आठवले यांनी सर्व आरपिआय च्या कार्यकर्त्यांना दिल्यामूळे आज आम्ही राज ठाकरे विरोधात एक दिवसीय आदोलन करत असल्याजी माहीत आरपिआयचे संगली जिल्हाअध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मशिदीवरील भोंगे हटवावे अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यात येईल अशी मागणी राज ठाकरे यांनी केल्यामुळे राज्यातील धार्मिक तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज भयभीत झाला आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मुस्लिम समाज बांधवांच्या पाठीमागे राहून मशिदीवरील भोंगे व मशिदीची संरक्षण करणे बाबत आदेश दिले. त्याचे आदेशावरुन जत मध्ये पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे व सांगली जिल्हा अध्यक्ष संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय धरणे आंदोलने प्रांत अधिकारी कार्यालय समोर करण्यात आला व मुस्लिम बांधवांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मुस्लिम समाजाने न घाबरता पूर्वीपासून चालत रमजान पवित्र सण उत्साहात साजरा करावा व भारतातील मुस्लिम समाज व हिंदू समाज सर्व एकोप्याने व बंधुत्वाने साजरे करतात एकदिलाने राहतात मुस्लिम समाज सुद्धा भारतीयच आहे आणि भारताच्या आर्थिक उन्नती मध्ये उद्योगधंद्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मशिदीवरील भोंगे यांच्या आवाजाने व आजान दिल्याने कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जात नाहीत किंवा आर्थिक नुकसान होत नाही त्यामुळे आजपर्यंत कोणत्याही जाती धर्मातल्या लोकांनी याबाबत कसलीही तक्रार केली नसून राज ठाकरे हे दोन जातीत तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आम्ही कदापिही चालू देणार नाही. राज ठाकरे यांनी वाढलेली महागाई बेरोजगारी शिक्षण इतर बाबीकडे लक्ष द्यावे व त्याबाबत बोलावे हिंदु धर्मातील सर्व सण राजकीय पुढाऱ्यांची सभा भाषणे वाढदिवस इत्यादी सर्व कार्यक्रम भोंगे ने होतात. मग विरोध करण्याचे कारण काय शासनाने आमची दखल घेऊन मशिदीवर चे भोंगे हटवू नयेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, किशोर चव्हाण, अरूण आठवले, तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील, पत्रकार राजू ऐवळे, कार्याध्यक्ष विनोद कांबळे, प्रा. हेमंत चौगुले, वैद्यकीय सेल जिल्हा कार्याध्यक्ष मोहशीन इनामदार, सिकंदर पटाईत, कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे तालुकाध्यक्ष सलीम गवंडी, दलित पँथर चे भूपेंद्र कांबळे, नगरसेवक टीमू ऐडके, साहेबराव कोळी, रफिक शेख, प्रहार चे महादेव हूचगोंड, महावीर मडीमणी, मातंग आघाडीचे दुर्गापा ऐवाळे. विलास बाबर शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रमेश साबळे, रामकृष्ण गंगणे, शब्बीर इनामदार, पापा हुजरे, गौस पखाली, जयंत भोसले, महिला आघाडीच्या माया आदाटे, शंकर पडसलगी, गणेश साळे, डीपीआयचे अविनाश वाघमारे, नगरसेवक आपू माळी, राहुल चंदनशिवे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment