राजे रामराव महाविद्यालय जत येथे ‘जागतिक पुस्तक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा.



दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी:- विल्यम शेक्सपियर या महान लेखकाचा मृत्यू २३ एप्रिल १६१६ या दिवशी झाला. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस यूनेस्को कडून ‘जागतिक पुस्तक दिवस ‘म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने यूनेस्को कडून १९९५ पासून २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस तसेच कॉपीराइट दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली गेली.                                       जत येथील राजे रामराव महाविद्यालयामध्येही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील श्रीमंत विजयसिंहराजे डफळे ग्रंथालयामार्फत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सी. ए. कोळी सहाय्यक शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल अँड जूनियर कॉलेज, माडग्याळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे असे म्हणाले की, ग्रंथ हे आपले गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, चांगले मित्र आहेत. त्यांच्यापाशी ज्ञानविज्ञानाचा जणू खजिनाच असतो. एखादा लेखक काळाच्या उदरात गडप झाला तरी त्यांनी मांडलेले श्रेष्ठ विचार पुस्तक स्वरूपात पुढील पिढ्यांसाठी जीवंत राहतात. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी पुस्तके अमूल्य असून ते आपले सर्वात चांगले मित्र आहेत. कारण ते ज्ञानविज्ञानाचे भांडार आहेत. मनुष्य येतो आणि जातो परंतु त्याचे श्रेष्ठ विचार, ज्ञान, उपदेश, संस्कृती, सभ्यता ही मानवी मूल्ये पुस्तकांच्या रूपात जीवंत राहतात. उत्तम पुस्तकांचे अध्ययन याचा अर्थ श्रेष्ठ व्यक्ति आणि त्यांचा विचार समजून घेणे व त्या विचारांशी मैत्री करणे होय. पुस्तकापेक्षा चांगला दूसरा कोणी मित्र नाही. ग्रंथ प्रदर्शनाचा मुख्य हेतु हा आहे की, ग्रंथ प्रदर्शनामुळे न पाहिलेली विविध पुस्तके विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होते. असे मत त्यांनी व्यक्त केले. 
या कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय विभाग आणि इंग्रजी विभागामार्फत करण्यात आले होते. संयोजक म्हणून प्रा. अभयकुमार पाटील आणि प्रा. आर. एस. बनसोडे यांनी काम पहिले. या ग्रंथप्रदर्शनास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन