कमल आर्थोपेडिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जत यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर सपंन्न.

दिव्यराज न्युज प्रतिनिधी:-  आज दिनांक.22-04-2022 रोजी श्री. मल्लिकार्जुन यात्रेनिम्मित, ग्रामपंचायत माडग्याळ व श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन,जत संचलित कमल आर्थोपेडिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जत यांच्यावतीने  श्री. महादेव मंदिर माडग्याळ येथे  मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.                                   कमल आँर्थोपेडिक सेंटरचे सर्वेसर्व तथा ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. के.प्रसाद, डॉ.चंद्रमणी उमराणी, माडग्याळचे सरपंच श्री.ईरान्ना (अप्पू) जत्ती, माजी उपसरपंच श्री.लक्ष्मण कोरे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ.हिट्टी, डॉ. हाक्के, डॉ.कुलकर्णी, डॉ.शिंदे, डॉ. बुध्याळ, डॉ. जाधव, डॉ.माळी, सोसायटी उपाध्यक्ष निंगाप्पा कोरे, तुकाराम बंडगर,श्रीमंत कोरे, उमेश खरात, लक्ष्मण कांबळे टेलर, आदी उपस्थित होते.           या शिबिरामध्ये मोफत ई.सी.जी, मधुमेह शुगर तपासणी, मणके व सांध्यांचे विकार, हाडांची तपासणी, हृदरोग, किडणी विकार, अनियंत्रीत रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन ची तपासणी अश्या अनेक आजारावर मोफत निदान व उपचार करण्यात आले. यावेळी माडग्याळ परिसरातील जवळजवळ तीनशे ग्रामस्थानी याचा लाभ घेतला.शिबीर पार पाडण्यासाठी कमल इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन जत चे शिक्षक आणि विद्यार्थी, जाधव सर, संतोष कांबळे, अमजद मकानदार यांनी मोलाचे सहकार्य लाभले. स्नेहभोजनाचे नियोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथ. आश्रमशाळा माडग्याळ येते मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन