मंत्री रामदास आठवले १४ मे रोजी जत दौऱ्यावर - जिल्हा अध्यक्ष संजयरावजी कांबळे.

दिव्यराज मराठी न्युज जत प्रतिनिधी :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे १४ मे रोजी जत दौऱ्यावर येत असून जत येथील श्री रामराम विद्या मंदिर पटागंणात सकाळी अकरा वाजता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावाचे आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
       यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, जतचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील, शंकर वाघमारे, विनोद कांबळे, मोहसीन इनामदार, विलास बाबर, गणेश साळे, सिकंदर पटाईद आदी उपस्थित होते.
   संजय कांबळे म्हणाले, जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. ही योजना मार्गी लागल्यास दुष्काळी जतचा दुष्काळ नाहीसा होणार आहे. म्हैसाळच्या मुख्य योजनेला केंद्राने पंतप्रधान सिंचन योजनेतून भरीव निधी दिला व योजना मार्गी लागली त्याच प्रमाणे विस्तारितची योजना मार्गी लावण्यासाठी केंद्राने निधी उपलब्ध करून द्यावा, जतमधील अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, म्हैसाळमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना भुसंपादनाचे पैसे त्वरित मिळावेत यासह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांकडे शेतकरी मेळाव्यात लक्ष वेधण्यात येणार आहे.
या मेळाव्यात भोंग्यावरून जे राजकारण तापले त्यावरून जातीय तेढ निर्माण झाला. अशा वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले, जातीय सलोखा टिकवल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात येणार असल्याचे संजय कांबळे यांनी सांगितले.
या मेळाव्यास रिपाइंचे प्रदेश, जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास शेतकरी व जत तालुक्यातील रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइं जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, जतचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन