प्रज्ञा काटे हिचा 'बहुजन युवती समाजरत्न' पुरस्कार देऊन गौरव.
दिव्यराज न्युज जत (प्रतिनिधी) :- जत येथील वक्तृत्वपटू कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे हिचा मुचंडी (ता.जत) येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्यावतीने 'बहुजन युवती समाजरत्न' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जत येथील सामाजिक कार्यकर्ते व स्टॅम्पव्हेंडर बाबासाहेब काटे यांची प्रज्ञा ही कन्या असून आतापर्यंत प्रज्ञा काटे हिने अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर वक्तृत्व स्पर्धा व कार्यक्रम प्रसंगी सहभाग घेत सामाजिक क्षेत्रात प्रबोधन करण्याचे काम केले आहे. ती बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून तिला सामाजिक कार्याचीही आवड आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन मुचंडी येथे गौरव करण्यात आला.
नुकतेच प्रज्ञा बाबासाहेब काटे हिला ग्लोबल फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने राज्यस्तरीय 'आदर्श बालगौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, सरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिता कांबळे, शंकर बेळुंखी, संजय बंडू कांबळे, प्रकाश शिवशरण, पी. बी. बिराजदार, शंकर कांबळे, रोहिदास शिवशरण, संजय क्यातन आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment