संखमध्ये श्री संत बागडेबाबा लोकार्पण सोहळयास प्रारंभ

जत- संख ( गोंधळेवाडी ) येथे श्री संत बागडेबाबा यांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास वीणा पूजनाने करताना हभप तुकाराम बाबा महाराज आदी.
दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांचे भव्य असे मंदिर चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी संख (गोंधळेवाडी) येथे बांधले आहे. हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या स्वप्नातील श्री संत बागडेबाबा यांच्या मंदिरांचा लोकार्पण सोहळयानिमित्य १६ मे पासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. २० मे रोजी श्री संत बागडे बाबा यांच्या मूर्तीची मिरवणूक तर २१ मे ला दहा वाजता भाविकांच्या उपस्थितीत मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची सांगता होणार आहे.
   हभप तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांचे गुरु श्री संत बागडेबाबा यांचे मंदिर संख येथे   उभारले आहे. कोणाकडूनही एक रुपया देणगी न घेता स्वखर्चाने हे मंदिर तुकाराम बाबा यांनी उभारले आहे. मागील दहा वर्षापासून या मंदिराचे काम सुरू होते. तुकाराम बाबा यांच्या स्वप्नातील मंदिर प्रत्यक्ष तयार झाल्यानंतर या मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. १६ मे पासून नामवंत किर्तनकारांचे किर्तन, भजन आयोजित केले आहे. ज्ञानेश्वरी पारायणही सुरू आहे. 
२० मे रोजी दुपारी तीन वाजता श्री संत बागडेबाबा यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक श्री लायव्वादेवी मंदिर ते बाबा आश्रम दरम्यान निघणार आहे. २१ मे ला मंदिराचा लोकार्पण सोहळा सकाळी दहा वाजता होणार आहे. मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभ पार पडणार आहे.  तुकाराम बाबा महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळयाची सांगता होणार आहे.
या सोहळ्यास जतकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
■ लोकार्पण सोहळयानंतर होणार वाढदिवस साजरा
चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांचा २१ मे ला वाढदिवस आहे. मंदिराचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर तुकाराम बाबा यांचा वाढदिवस साजरा होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन