राजे रामराव महाविद्यालय जत येथे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन.

दिव्यराज मराठी न्युज जत प्रतिनिधी :- येथील राजे रामराव महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय लोकशाहीची वाटचाल व भवितव्य या विषयावर दि. 5 व 6 मे 2022 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील व चर्चासत्राचे समन्वयक डॉ. भीमाशंकर डहाळके यांनी दिली.
      या चर्चासत्रामध्ये भारतीय लोकशाहीची वाटचाल व भवितव्य या विषयावर देशभरातील वेगळ्या मान्यवरांची व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. संकेश्वर, कर्नाटक येथील डॉ. बलगोंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचा शुभारंभ होणार आहे. या दोन दिवशीय चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व वक्त्या डॉ. दीपा श्रावस्ती, नांदेड येथील डॉ. महादेव बेलखेडे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राजेंद्र भनगे, सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी पाटील व प्रसिद्ध पत्रकार गुरुबाळ माळी, त्याचबरोबर  संशोधक विद्यार्थी, देशभरातील तज्ञ प्राध्यापक, महाविद्यालयाचे विद्यार्थी व जत परिसरातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. 
       या राष्ट्रीय चर्चासत्राच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रक प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील, समन्वयक डॉ. भीमाशंकर डहाळके, प्रा. अतुल टीके, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. शिवाजी कुलाळ हे पार पाडत आहेत. चर्चासत्राला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ व अर्थ सहसचिव मा. सीताराम गवळी यांचे मार्गदर्शक लाभत आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन