भारतीय लोकशाहीमध्ये युवकांचे योगदान महत्वाचे: डॉ. बाळगोंडा पाटील


राजे रामराव महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
दिव्यराज मराठी न्युज  जत प्रतिनिधी: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये लोकशाहीच्या चार स्तंभाबरोबर युवकांचे योगदान महत्त्वाचे असेल, असे प्रतिपादन संकेश्वर कर्नाटक येथील डॉ. बाळगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये प्रमुख बीजभाषक म्हणून बोलत होते. यावेळी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुरचे सांगली विभागप्रमुख व  पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगावचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
    आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवन जगत असताना भारतीय लोकशाहीच्या चार स्तंभांचा चिकित्सक अभ्यास करावा. अलीकडच्या काळामध्ये लोकशाहीचे हे चार स्तंभ ढासळत असताना विद्यार्थ्यांनी नागरिक म्हणून पाचव्या स्तंभ उभा केला पाहिजे. या दोनदिवशीय चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व वक्त्या डॉ. दीपा श्रावस्ती, सांगोला येथील प्रा. जे. व्ही. माने, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राजेंद्र भनगे, लातुर येथील शिवाजी कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शामराव लेंडवे व प्रा. चंद्रसेन माने पाटील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
      या राष्ट्रीय चर्चासत्राला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील, समन्वयक डॉ. भीमाशंकर डहाळके, प्रा. अतुल टीके, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. शिवाजी कुलाळ, देशभरातील संशोधक विद्यार्थी शिक्षण तज्ञ तज्ञ प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जत परिसरातील नागरिक उपस्थित होते. चर्चासत्राला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ व अर्थ सहसचिव मा. सीताराम गवळी यांचे मार्गदर्शक लाभले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन