राजे रामराव महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात. गुणवंत खेळाडू, विद्यार्थी व प्राध्यापकांचा केला सन्मान.

दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- येथील राजे रामराव महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि. ७ मे २०२२ रोजी महाविद्यालयांमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध वक्ते प्रा. उल्हास माळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले की, शिवपुत्र शंभूराजे यांचा त्याग, तपस्या व प्रेरणा युवकांनी घ्यावी. छत्रपती संभाजी राजे हे तरुणांचे आदर्श असले पाहिजेत. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 
       वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा. सुखदेव नरळे यांनी या शैक्षणिक वर्षात झालेल्या विविध स्पर्धा, कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद त्याचबरोबर विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख केला. जिमखाना प्रमुख प्रा. अनुप मुळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडू, विद्यार्थी, प्राध्यापक यांचा अहवाल सादर केला. यामध्ये सुनील कोटगोंड, खुशबू मुजावर, संदेश मोटे, कुसुम चव्हाण, प्रगती सावंत, प्राजक्ता टेंगळे, गीतांजली मोरे, ऋतुजा जगताप, नागाप्पा खांडेकर, बिरदेव करे, अनिल घाटगे, आकाश होळकर, कुमार खडतरे, किशोर साळे, अश्विनी माने, पांडुरंग चौगुले, प्रतीक्षा चव्हाण, वैष्णवी मोरे, अश्विनी यादव, प्रियल माळी, संध्याराणी साळे, सरिता जाधव, शुभांगी माने, पुनम कटीकर व सुजाता सावंत या खेळाडूंना समावेश आहे.  त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट नागाप्‍पा खांडेकर, मल्हारी कारंडे, राहुल शिंदे, वैभव यमगर व राष्ट्रीय सेवा योजनेच्या शुभांगी माने यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला. शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पदवी पीएचडी संपादन केलेल्या प्राध्यापकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आला. यामध्ये डॉ. निर्मला मोरे,  डॉ.परमेश्वर थोरबोले, डॉ. मल्लाप्पा सज्जन, डॉ. संगीता देशमुख डॉ. ललिता सपकाळ डॉ. राजाराम सुतार यांचा समावेश आहे. सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोनाली पाटेकर, मेहजाबिन मुजावर, प्रियांका भुसनर व शिवाजी विद्यापीठाचा लघु प्रकल्प मिळवणाऱ्या डॉ. विजय जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून शिल्पा कांबळे, अश्विनी पाटील, सुनील बामणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये धनश्री गवते, अर्शिया शेख, तनुजा एकुंडे, सतीश कोळेकर, अश्विनी पाटील योगेश कोळेकर यांचा समावेश आहे, तर विविध विभागात प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत माने, श्रद्धा शिंदे, प्रतिक्षा चौगुले, गणेश वगरे, अरुण यलमार, ऋतुजा हिप्परगी, विश्वास मोटे, वैष्णवी पाटील, पूजा गडदे, पूजा माळी, शुभांगी बिरादार, प्रतिभा कायपुरे, आशिष खांडेकर, प्रतीक्षा पाटील, कोमल कुलाळ, अंकिता गायकवाड व निखिल पुजारी या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
   या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे, सकाळ सत्राचे प्रभारी प्रा. सिद्राम चव्हाण, दुपार सत्राचे प्रभारी प्रा.महादेव करेन्नवर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. शिवाजी कुलाळ, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुखदेव नरळे, सुत्रसंचलन प्रा.अतुल टिके व डॉ. निशाराणी देसाई यांनी तर प्रा. दीपक कांबळे यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.