चिक्कलगी -भुयार मारोळी रस्ता डांबरीकरण करा- तुकाराम बाबा महाराज. आ. समाधान अवताडे यांना दिले निवेदन.
दिव्यराज न्युज जत :- भुयार येथे श्री संत बागडे बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भक्तांची नेहमीच गर्दी असते. त्याच बरोबर हुलजंती, मंगळवेढा येथे जाण्यासाठी चिक्कलगी भुयार मारोळी (ग्रामीण मार्ग)हा एकमेव पर्याय आहे. परंतू या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी करून रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी चिक्कलगी भुयार मठाला भेट दिली. मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी आ अवताडे यांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, चिक्कलगी भुयार येथे श्री संत बागडे बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भक्तांची नेहमीच गर्दी असते. त्याच बरोबरहुलजंती, मंगळवेढा येथे जाण्यासाठी चिक्कलगी भुयार मारोळी (ग्रामीण मार्ग हा) एकमेव पर्याय आहे. परंतू या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत परिणामी अपघातांची संख्या वाढ.
Comments
Post a Comment