रिपब्लिकन पक्षाचे राजीनामे देऊन तालुका अध्यक्षासह अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश- अमोल भैया साबळे यांची माहिती.
दिव्यराज न्युज जत :- श्रीकांत होवाळे, राकेश कांबळे, शब्बीर नदाफ, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आर पी आय चा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी मध्ये यांनी जाहीर प्रवेश केला, त्याच बरोबर अनेक कार्यकर्ते हे इच्छुक असुन तेही कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भैया साबळे यांनी दिली. पक्षप्रवेश हा वंचित बहुजन आघाडी चे जिल्ह्याचे अध्यक्ष महावीर तात्या कांबळे तसेच महासचिव फारुख भाई कमरी जिल्हा युवक अध्यक्ष राजू मुल्ला यांच्या वतीने जाहीर प्रवेश हा घेण्यात आला त्यामुळे जत तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ची ताकद दुपटीने वाढलेली असून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचा निर्धार यावेळेस एक मताने घेण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment