जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस आले आहेत - श्रीदेवी कट्टीमणी. पोलीस पाटील लक्ष्मीताई कांबळे ही उपस्थित
दिव्यराज न्युज जत वार्ताहर :- जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस आले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांनीही प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा असो वा कोणत्याही अडचणी असतील तरी आम्ही त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे मत मेंढेगिरीचे माजी उपसरपंच श्रीदेवी कट्टीमणी व पोलिस पाटील लक्ष्मीताई कांबळे यांनी नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय ऐवळे, कुलकर्णी मँडम, कुंभार मँडम, माजी सरपंच सुभाष बिरादार, उपसरपंच अजित कांबळे, व पालकवर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment