इंग्रजी ही उच्च शिक्षणातील विविध क्षेत्रात संधी निर्माण करणारी भाषा: डॉ. परमेश्वर थोरबोले. राजे रामराव महाविद्यालयात एकदिवशीय चर्चासत्र संपन्न
दिव्यराज न्युज जत :- इंग्रजी ही कला, वाणिज्य,विज्ञान,तंत्रज्ञान,संशोधन व उद्योग या क्षेत्रात जगभर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी भाषा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ.परमेश्वर थोरबोले यांनी व्यक्त केले.ते राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सकाळ सत्राचे प्रभारी प्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण व चर्चासत्राचे समन्वयक प्रा. विजय यमगर उपस्थित होते.
चर्चासत्राचे दुसरे वक्ते प्रा. रामदास बनसोडे म्हणाले की, उच्च शिक्षणात यशस्वी करीयरसाठी इंग्रजी भाषा आवश्यक असून या भाषेमुळे अनेक रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा निर्माण होत आहेत. राजे रामराव महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग यासाठी सातत्याने कार्यरत असून विभागाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात ज्ञान, कौशल्य व करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. चर्चासत्राचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. रामदास बनसोडे, सूत्रसंचालन प्रा. तुकाराम सन्नके तर आभार प्रा. ओमकार कुडाळकर यांनी व्यक्त केले. या चर्चासत्राला महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment