विद्यार्थ्यांना शासकीय दाखले त्वरित द्यावे अन्यथा आंदोलन उभाऊ :- प्रहार संघटनेची मागणी


दिव्यराज न्युज जत :- विद्यार्थ्यांना शासकीय दाखले त्वरित द्यावे अन्याय आदोलन उभारू प्रहार संघटनेची तहसिलदार जिनव बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.                   राज्यातील सर्व शाळा, काँलेज सुरू झाले आहेत. चालू शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये विद्यार्थांना अँडमिशन घेण्यासाठी उत्पन्नाचे दाखले रहिवाशी दाखले, जातीचा व उत्त्पन्नाचे दाखले, अल्पभूधारक दाखले, नॉन क्रिमीलेअर दाखले, असे अनेक शासकीय दाखल्याची गरज लागते. पंरतू तहसील कार्यालयातील व सेतू केंद्रातील सर्व्हर बंद पडणे, मंडल अधिकारी, तलाठी कामावर नसणे अशा अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. दाखले मिळूपर्यंत अँडमिशन तारीख निघून जाते. आणि त्या विद्यार्थ्यांना ज्यादा शुल्क भरून अँडमिशन घ्यावे लागते.                           जे गरीब विद्यार्थी असतात त्यांचे वर्ष वाया जाते, केवळ कागदपत्रे तयार नसल्याने. याची दखल घेऊन गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल बागडे यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याबरोबर चर्चा करून लेखी स्वरूपात निवेदन दिले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन