जत शहराच्या जवळून जाणारा जुना कंठी रस्ता दुरूस्त करावे- आ.विक्रमदादा सावंत यांच्याकडे मागणी.
दिव्यराज न्युज जत :-(राजू ऐवळे) जत शहराच्या जवळून जाणारा जुना कंठी रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावरून जाणारे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असल्याने जतचे क्रियाशील आमदार श्री. विक्रमसिंह सावंत यानी जत येथिल २२० के.व्ही. विद्यूत केंद्र ते माजी नगराध्यक्ष रविंद्र साळे यांच्या मळ्यापर्यंतचा रस्ता मंजूर करावा.रस्त्याचे खडीकरण, मुरूमीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे यांनी केली आहे.
या विषयी बोलताना कांबळे म्हणाले की, जत शहराच्या जवळून पाटबंधारे ऑफीस, पाटबंधारे काॅलनी, सुनेत्रा काॅलनी, २२० के.व्ही. विद्यूत केंद्र, शासकिय लागवड कार्यालय, बंडगर वस्ती ते माजी नगराध्यक्ष रविंद्र साळे यांच्या मळ्यापर्यंत जाणारा व पुढे कंठीला जाणारा जुना कंठी रस्ता सद्या वाहनधारकांसाठी गैरसोयीचा बनला आहे. या रस्त्यावरून जाताना अदीवाशी भागात चालल्यासारखे वाटते. आतापर्यंत कोणीही लोकप्रतिनिधीनी या रस्त्याचे दुरूस्तीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब व दयनीय अशी झाली आहे. या रस्त्यावरून येणारे जाणारे कुटुंबे ही दोनशे एवढी असल्याने हा रस्ता खडीकरण, मुरूमीकरण व डांबरीकरण होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
याकरिता जतचे क्रियाशील आमदार श्री.विक्रमसिंह सावंत यानी जत येथिल २२० विद्धूत केंद्र ते माजी नगराध्यक्ष रविंद्र साळे यांच्या मळ्यापर्यंतचा अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता मंजूर करून या रस्त्याचे खडीकरण, मुरूमीकरण व डांबरीकरण करून रस्ता वाहतूकीयोग्य बनवून या भागातील लोकांना न्याय द्यावा अशी मागणी ही कांबळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment