जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत - युवा नेते संजय तेली
दिव्यराज न्युज उमदी/वार्ताहर :- जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. तसेच जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांनीही प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा असो वा कोणत्याही अडचणी असतील तरी आम्ही त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे मत भाजपचे युवा नेते संजय तेली यांनी नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच पिरसाब जमादार, माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला, मलकु सुरगोंड उपस्थित होते. उमदी जिल्हा परिषद मतदार संघाचे युवा नेते मा. संजय तेली यांच्या नेतृत्वाखाली आज उमदी जिल्हा परिषद गटातील उमदी, सोनलगी, सुसलाद, हळ्ळी, बालगाव, बेंळोडगी, बोर्गी, अक्कळवाडी गावातील प्राथमिक जिल्हा परिषद मराठी व कन्नड शाळेतील नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व जिलेबी देऊन करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक शाळेतील शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन प्रोस्ताहन करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रवी शिवपुरे, बसू भुसारे, योग्याप्पा पुजारी, अभिमन्यु लोणी, राजू कोकळे, उमेश हडपद सह आदी मान्यवर उपस्थित होते. युवा नेते संजय तेली यांनी हा उपक्रम केल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गातून स्वागत केले जात आहे.
Comments
Post a Comment