जत भाजपच्या तालुका अध्यक्ष पदी प्रमोद सावंत यांची निवड.
दिव्यराज न्युज जत :- जत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुनिल पवार यांनी माजी आमादार विलासराव जगताप यांच्या विरूद्ध अचानक बंड केल्याने त्यांच्या जागी अचकनहळीचे माजी सरपंच प्रमोद सावंत यांची भाजपचे मिलिंद बापू पोरे यांच्या उपस्थितीत आज निवड करण्यात आली. यावेळी तालुक्यातुन अनेक पदाधीकारी उपस्थित होते. तेव्हा आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली. तेव्हा विलासराव जगताप म्हणाले की, जत नगरपरिषद, पंचायत समिति, जिल्हा परिषद तसेच मार्केट कमीटीचे निवडणूक ताकतीने लढऊ, ते जिंकू व सामान्य कार्यकर्ते यांना संधी देऊ. उमेश सांवत म्हणाले की, जगताप साहेब ४० वर्षे झाले राजकारण करतात अनेक सामान्य कार्यकर्ते यांना सदस्य पासुन ते जि.प चे अध्यक्ष केले परंतू काही लोक त्यांना सोडून गेले. सामान्य जनतेसाठी लढणार्या जगताप साहेबांना विधानपरिषदे वर संधी ध्यवी. संग्राम जगताप यांनी एक सल्ला दिला.ते म्हणाले की जगताप साहेंबानी कार्यकर्त्यांना खुप मोठे केले पण ते साहेबांना सोडून गेले परंतु इथुनपुढे पक्षात येणाऱ्यांना या म्हणावे व पक्षातून जाणाऱ्यांना तु कसे जातोस ते मी बगतोच म्हणावे. अनेक कार्यकर्ते विलासराव जगतापच आमचे पक्ष आसे म्हणत दुजोरा दिले. यावेळी नुतन तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, संग्राम जगताप, राजू चोगुले, महादेव पाटील, मिलींद पोरे, डाँ. रविंद्र आरळी, प्रभाकर भाऊ जाधव, आकाराम मासाळ, रमेश बिरादार, मिलिंद बापु पाटील, उमेश सावंत, गौतम ऐवळे, आण्णा भिसे, आंनदराव पाटील, महेश संत्ती, सरपंच विजय नामद, राजू हिपरगी, रामाण्णा जिवणावर, शंकर वगरे सर, संजय तेली, तमन्नगौडा रविपाटील, उपस्थित होते.
Comments
Post a Comment