जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आरपीआय किंगमेकर ठरणार- जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे-पाटील.
दिव्यराज न्युज जत :- तालुक्यातील १० जिल्हा परिषद व २० पंचायत समिती गणात तसेच शहरात गेले बरीच वर्षे आमच्या पक्षाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांचे जिव्हाळ्याची प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वेळोवेळी आंदोलन मोर्चा आंदोलने करून वीज माफी, रस्ते दुरुस्ती शहरातील स्वच्छता,नळ पाणीपुरवठा ,गटारी नालेसफाई जतशहर व तालुक्यातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती याचबरोबरीने गोरगरिब नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा शासनाचे डोळे उघडण्याची काम केले आहे. तसेच रस्ता दुरुस्तीसाठी प्रसंगी रस्ता रोको करून रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून रस्ता दुरुस्त करण्यास भाग पाडले आहे तालुक्यात गोरगरीब, मागासवर्गीय , शेतकरी,आदिवासी समाजासाठी नेहमीच जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्र दीपक काम केले असून मागील काही दिवसापूर्वी पूर्व भागात संख येथे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा एक मोठा मेळावा घेतला होता तसेच दिनांक 14 मे 2022 रोजी जत येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामदासजी आठवले साहेब व महाराष्ट्रातील रिपाई चे पदाधिकारी यांचे उपस्थिती भव्य शेतकरी मेळावा घेतला होता या मेळाव्यात केंद्रीय मंत्री यांचे मार्फत तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी मिळण्यासंदर्भात पाठपुरावा केला व शेतकरी गोरगरीब शेतमजूर आदिवासी मुस्लिम समाजातील बांधवांनी या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात लक्षणीय उपस्थिती दाखवली होती त्यामुळे कार्यकर्ते पूर्णपणे रिचार्ज झाली असून सर्व गावागावात आरपीआय व संजय कांबळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आमचे मतदान हे निर्णयांक ठरणारे आहे येणाऱ्या पंचायत समिती जतचे सत्ता केंद्र व सभापती निवड हे आरपीआयच्या मदतीशिवाय होणार नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी जत नगरपरिषद वार्ड क्रमांक पाच पोट निवडणुकीत त्याचा अनुभव सर्व नागरिकांना आला आहे वार्ड क्रमांक पाचच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे राजू यादव यांनी रिपाईच्या पाठिंबामुळेच निवडणूक जिंकलेली आहे. येणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी सर्व गटात आम्ही सक्षम उमेदवार देणार आहोत आमचे सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करून प्रचार यंत्रणा राबवतील व आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रवेश करणार आहोत मा. संजय कांबळे यांच्या कामाची पद्धत व धडपड पाहून गाव गाड्यातील सामान्य गोरगरीब कुटुंबातील जनसामान्यातील माणूस आमच्या पक्षात प्रवेश करत आहे याचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे त्याचबरोबर प्रस्थापित पक्षातील मंडळी व नाराजी हीसुद्धा आमच्या पत्त्यावर पडणार आहे व आम्हाला पोषक ठरणार आहे या निवडणुकीत शेगाव , डफळापुर, बिळूर, जाडरबोबलाद,उमदी या ठिकाणी आम्हाला वातावरण पोषक आहे आरपीआयची जत येथे प्रमुख कार्यकर्त्याच्या उपस्थित बैठक झाली या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे जिल्हा उपाध्यक्ष किशोरराजे चव्हाण जिल्हा युवक कार्याध्यक्ष हेमंत चौगुले तालुकाध्यक्ष मा. संजय कांबळे पाटील कार्याध्यक्ष विनोद कांबळे सरचिटणीस प्रशांत ऐदाळे वाहतूक आघाडीचे राहुल वाघमारे तालुका उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे गणेश साळे सुभाष कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते व आपले मनोगत व्यक्त केले.
Comments
Post a Comment