क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मीमण स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम निमित्ताने इस्लामपूर ते जत मशाल यात्रा.
दिव्यराज न्युज जत:- जत तालुक्यातील सिंदूर या महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम निमित्ताने इस्लामपूर ते सिंदूर मशाल यात्रा काढण्यात आली. जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी मशाल यात्रेचे स्वागत सांगली जिल्हा आरपीआय अध्यक्ष संजय कांबळे, यांनी केले तर आभार नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी माणले त्यानंतर मशाल यात्रा सिंदूर गावांकडे निघाली मशालयात्रा सिंदूर गावात पोहचल्यानंतर क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सभा संपन्न झाली. सभेत क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मीमण यांच्या कार्याची माहिती वक्त्यांनी दिली. क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मीण यांचे कार्य महाराष्ट्र राज्यातील जत तालुक्यात असले तरी कर्नाटक राज्यात नाटक, सिनेमा यांच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी झाली असली तरी महाराष्ट्र राज्यात क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मीमण परिचित नाहीत. यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव,प्रा.राजेंद्र कुंभार, डॉ. आर.के.पल्लकी,लक्ष्मीमण नाईक, राम नाईक,भीमगोंडा पाटील, के.डी.शिंदे,गंगप्पा हारुगेरी,प्रा.दादासाहेब ढेरे, आप्पासाहेब नामद, जत तालुका ओबीसी संघटनेचे नेते तुकाराम माळी,रविंद्र सोलनकर, अल्लाबक्ष मुल्ला, अर्जुन कुकडे, आवाण्णा कांबळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment