राजे रामराव महाविद्यालय व सोहम चॕरिटेबल ट्रस्ट यांच्यात सांमजस्य करार

दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना क्रीडा प्रसार, क्रीडा नैपुण्य व क्रीडा क्षेत्रातील स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जत येथील राजे रामराव महाविद्यालय व सोहम चारिटेबल ट्रस्ट संचलित सोहम करिअर अॕकॅडमी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.या सामंजस्य कारारातून महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनींना पोलीस, सैन्य, व तत्सम भरतीपूर्व शारीरिक प्रशिक्षण, योगा व प्राणायाम तसेच उभय संस्थांतील पायाभूत सुविधांचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय समोर ठेवून सोमवार दिनांक 19 जुलै 2022 रोजी राजे रामराव महाविद्यालयात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी राजे रामराव महाविद्यालयाचे प्र प्राचार्य प्रा. डॉ.सुरेश पाटील सोहम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मेजर श्री. पांडुरंग सावंत, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ.शिवाजी कुलाळ, शारीरिक क्रीडा संचालक श्री अनुप मुळे,अतुल टिके,उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन