जिल्हा परिषद कन्नड शाळा कोंणत्योबोबलाद येथे त्वरित शिक्षकाची नेमनुक करा अन्यथा जत पंचायत समिती समोर आंदोलन करू- लोकनियुक्त सरपंच बसवराज पाटील.
दिव्यराज न्युज नेटर्वक जत :- जिल्हा परिषद कन्नड शाळा कोंणत्योबोबलाद येथे त्वरित शिक्षकाची नेमनुक करा अन्यथा जत पंचायत समिती समोर आंदोलन करू अशा ईशारा लोकनियुक्त सरपंच बसवराज पाटील यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे. पाटील पुढे म्हणाले आहे की, जिल्हा परिषद कन्नड शाळा कोंणत्योबोबलाद येथे १ली ते ७वी पर्यंत शाळा आहे. विध्यार्थी संख्या ही १५४ आहे वास्तविक पाहता ८ शिक्षक असने गरजेची आहे .शिक्षकांची पद संख्या ७ मंजूर असुन देखील फक्त ४ शिक्षक सेवेत आहे. त्यामुळे विध्यार्थीचे नुकसान होत आहे. विध्यार्थी गुणवत्ता मध्ये वाढ होईना झाले आहे म्हणून सात दिवसामध्ये शिक्षकाची नेमणुक करा अन्यथा आठव्या दिवशी पंचायत समिती जत येथे आंदोलन करणार असल्याची बसवराज पाटील यांनी निवेदनात म्हटले आहेत
Comments
Post a Comment