दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करा :- 'प्रहार' संघटनेची मागणी, सुनिल बागडे यांनी दिले निवेदन.
दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करावे या मागणी प्रहार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दिव्यागांची संख्या सुमारे ५० लाख इतकी आहे. यातील अनेक दिव्यांग आजतागायत शासकीय लाभापासून वंचित आहेत. त्यांच्या उन्नती व सर्वागिण विकासासाठी मागासवर्गीय महिला अल्पसंख्यांक व क्रीडा मंत्रालयाप्रमाणे दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय राहावे, यासाठी आमदार बच्चू कडू सातत्याने मागणी करत आहेत. या मागणीला पाठींबा म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या मोहीम घेऊन याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाठविले जाणार आहे. अशा प्रकारची मोहिम राबविली जाणार असून याची दखल सरकारने घेतली नाही तर धडक मोर्चा काढण्याचा इशारा बागडे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment