जत येथे महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाचे वतीने जेष्ठ नागरिक व गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.

दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- शनिवार दिनांक 20/8/2022 रोजी दत्त मंदिर जत येथे महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळ सांगली व संत गाडगेबाबा परिट समाज जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत येथील गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ .प. तुकाराम बाबा महाराज  तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहर सदाशिव साळुंखे ,सांगली जिल्हा अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष वधु वर सुचक यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम समाजातील जेष्ठ नागरिक श्री चंद्रशेखर परीट व श्री हनुमंत साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जत तालुक्यातील परिट समाजामध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिल्ड, प्रमाणपत्र  वह्या व पेनचे वाटप करून सत्कार करण्यात आला.                                         कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक भाषणाने करण्यात आली भारत गायकवाड यांनी जत तालुक्यातील परीट समाजाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचे कार्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला,त्यानंतर जिल्हा कार्यकारणी मधील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेश्री तुकाराम बाबा महाराज यांनी संत बागडे बाबा व गाडगेबाबा या महान संतांनी केलेल्या कार्याचा आदर्श आमच्या समोर मांडला व त्यांनी सांगितलेल्या दिशेने आम्ही सर्व समाज बांधवांनी वाटचाल करावी असा उपदेश केला शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर साळुंखे यांनी अध्यक्ष भाषण केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री शहाजी साळुंखे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री संजय साळुंखे यांनी मानले.
या कार्यक्रमाला सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो समाज बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन