चिखलगी भुयार मठात भागवत कथा ज्ञानयज्ञास प्रारंभ; दोन सप्टेंबरला सांगता. संत गाडगेबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
दिव्यराज न्युज जत :-राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्य चिखलगी भुयार मठ येथे २६ ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान सायंकाळी सात ते दहा दरम्यान श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी भागवत कथेस प्रारंभ झाला. देवाची आळंदी येथील भागवताचार्य शिवाजी महाराज, वटंबे यांच्या उपस्थितीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू झाला आहे.
चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीनंतर दोन वर्षांनी अयोजित केलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास भाविकांची गर्दी होत आहे.
शुक्रवारी विणा उभारून भागवत कथेस प्रारंभ झाला.शुक्रवारी भागवत म्हात्म नारद, चित्रण पूर्वचरित्र जन्मकथा पार पडली. शनिवारी भीष्म स्तुती विदुर काका चरित्र, सती प्रसंग कपिल देवहूती संवाद, चरित्र सृष्टीचा विस्तार कथेतून मांडण्यात आला.
रविवारी श्री ध्रुव चरित्र, ऋषभ देव जी चरित्र, चरित्र श्री जडभरत जी चरित्र, सोमवारी श्री प्रल्हाद चरित्र गजेंद्र मोक्ष वामन चरित्र रामकथा, चरित्र श्री कृष्ण जन्मोत्सव, मंगळवारी श्री कृष्ण बाललिला कालिया मर्दन गोवर्धन परिक्रमा महोत्सव, चरित्र ५६ भोग प्रसाद, बुधवारी रासलीला प्रसंग कृष्ण मथुरा आगमन उद्धव गोपी सवांद, चरित्र कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा, एक सप्टेंबर रोजी राजसूय यज्ञ प्रसंग, सुदामा चरित्र, वासुदेव नारद सवांद, जनक योगेश्वर सवांद कृष्ण उद्धव सवांद, चरित्र परीक्षिती मोक्ष महाआरती प्रसाद होणार आहे.
दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दहीहंडी फोडून, गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. कोरोनाच्या महामारीनंतर दोन वर्षानंतर मठात धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे. यावेळी खडकी येथील सुदर्शन महाराज यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment