वृक्षारोपण ही काळाची गरज :- आमदार विक्रमसिंह सावंत. राजे रामराव महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जगभरात येणाऱ्या अनेक नैसर्गिक आपत्ती या पर्यावरण असंतुलनामुळे येत आहेत. पर्यावरण वाचवायचे असल्यास त्याची काळजी घेणे व वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे मत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयामध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी यल्लमा देवस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्रीमंत शार्दुलराजे डफळे उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत शार्दुलराजे डफळे बोलताना म्हणाले की,महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाने आंबा, बांबू, वेगवेगळ्या फुलांची झाडे, दुर्मिळ कॅक्टस यासह अनेक देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून येणाऱ्या पिढीस पर्यावरणीय माहितीचा खजाना निर्माण केला आहे. महाविद्यालय एक प्रकारे जत व परिसरातील लोकांसाठी नंदनवनच ठरत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.(डॉ.)सुरेश एस.पाटील बोलताना म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडेझुडपे महत्त्वाचे घटक आहेत. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन पातळी समान ठेवण्यासाठी झाडांचे योगदान मोठे आहे. गावोगावी वृक्षारोपणाची मोहीम राबविल्यास पर्यावरण संतुलनासह परिसराचा कायापालट होऊ शकतो म्हणूनच वृक्षारोपण गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सकाळ सत्र प्रभारी प्रा.सिद्राम चव्हाण,दुपार सत्र प्रभारी प्रा.महादेव करेण्णवार ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष संचालक डॉ.शिवाजी कुलाळ, प्रा.सुखदेव नरळे, डॉ.निर्मला मोरे,डॉ.राजेंद्र लवटे प्रा.कृष्णा रानगर डॉ.शंकर गावडे, डॉ.भीमाशंकर डहाळके ,प्रा.नारायण सकटे, प्रा सज्जन प्रा हिरामण टोंगारे, डॉ.अशोक बोगुलवार ,प्रा.जी,डी.साळुंके,प्रा.अतुल टिके,अमोल डफळे,राजू माळी, अदीक घुगरे, बिरुदेव सदकाळे, श्रीशैल बिरादार व वरिष्ठ कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते बंधु भगिनी,विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment