उच्च शिक्षणात ग्रंथालयाचे महत्त्वाचे योगदान :- प्रा.अभयकुमार पाटील.

दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :-          (राजू ऐवळे) नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत उच्च शिक्षणात ग्रंथालयाचे महत्त्वपूर्ण स्थान व योगदान असून विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा, असे प्रतिपादन प्रा.अभयकुमार पाटील यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहादिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेच्या निमित्ताने प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
      आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील म्हणाले, महाविद्यालयाचे ग्रंथालय आधुनिक व सुसज्ज असून पन्नास हजारापेक्षा जास्त पुस्तके व संदर्भग्रंथ महाविद्यालयाच्या वाचकांसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ई- स्वरूपामध्ये चार लाखापेक्षा जास्त पुस्तके, सहा हजारापेक्षा जास्त नियतकालिके व जर्नल्स ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
        या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अतुल टिके, आभार डॉ. भीमाशंकर डहाळके तर सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा. गोविंद साळुंखे प्रा. दादासाहेब रणदिवे, प्रा. शिवानंद माळी, प्रा. ओमकार कुडाळकर, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन