वाचन व श्रवण गरजेचे: प्राचार्य डॉ. सतीश घाटगे. राजे रामराव महाविद्यालयात दहादिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळा संपन्न.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- विद्यार्थी दशेत वाचन व श्रवण अत्यंत गरजेचे असून, एक आदर्श विद्यार्थी व भविष्यातील सुजाण नागरिक घडण्याचा हा पाया आहे. वाचन व श्रवणाने विद्यार्थी सुसंस्कृत होतो, असे प्रतिपादन प्राचार्य प्रा. डॉ. सतीश घाटगे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहादिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
        पुढे बोलताना ते म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा महाराष्ट्रातील खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्याचे पुण्य काम केले. तेथील शेतकरी व कामगारांची अत्यंत गरीब व हालाखीच्या परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन खूप मोठ्या पदावरती आज मजल मारली आहे. बापूजीनीं ज्ञान, विज्ञान त्याचबरोबर सुसंस्काराची पेरणी केली. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्काराची बीजे पेरली गेली आहेत, असेही ते म्हणाले.
        आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक कायद्यामधील बदलामुळे शिक्षण क्षेत्रात बराचसा बदल झाला असून शिक्षणात वैविध्यपूर्णता आली आहे. एकाच वेळी दोन पदव्या विद्यार्थ्यांना घेता येतील. विविध क्षेत्रात कौशल्य व आवड निर्माण करण्याचा या पाठीमागचा सरकारचा दृष्टिकोन दिसतो. या दहादिवशीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी विविध विषयावरती व्याख्यानाचा आनंद घेतला. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा, परिसंवाद व चर्चासत्र आयोजित केली जातील, असेही ते म्हणाले.
       या सांगता समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. शिवाजी कुलाळ, आभार डॉ. भीमाशंकर डहाळके तर डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला सकाळ सत्राचे प्रभारी प्रा. सिद्राम चव्हाण, प्रा. तुकाराम सन्नके, प्रा. रामदास बनसोडे, प्रा.अभयकुमार पाटील, प्रा. गोविंद साळुंखे, प्रा. राहुल कांबळे त्याचबरोबर महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन