जि.प मराठी शाळा जत नं १ येथे सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने शाळेतील शिक्षकांचा भव्य सत्कार- अध्यक्ष मोहन माने-पाटील.
दिव्यराज न्युज नेटवर्क :-5 सप्टेबर2022 रोजी जि.प मराठी शाळा जत नं1 येथे सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकांच्या वतीने शाळेतील शिक्षकांचा भव्य सत्कार युवा नेते संताेष माेटे,काेराेणा याेध्दा सामाजीक कार्यकर्ते श्रीकांत दादा साेणवने,राष्ट्रवादीचे युवक नेते शफीक भाई इनामदार ,दयानंद ऐवळे आदी मान्यवरांच्या यांच्या हस्ते काेल्हापूरी फेटा बांधून व झाड देऊन सत्कार करणेत आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन माने पाटील, उपाध्यक्षा सौ रोहिणी जाधव, सदस्य संतोष देवकर, पत्रकार बादल सर्जे, याेगेश दादा ऐडके, विकास शिंदे ,नाना काेडग, शिवाजी पाटील,आजद मुल्ला ,डॉ माळी, गणेश कुकडे, आदी मान्यवर उपस्थितीत होते.
सुरवातीस डॉ सर्वपल्ली राधा कृष्णनन यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला त्यानं तर सर्व शिक्षकांचा सत्कार करणेत आला सुरुवातीस मुख्याध्यापक श्री संभाजी कोडग, आशा हावळे, मिनाक्षी शिंदे या सर्वांचा काेल्हापूरी पध्दतीचा फेटा बांधूण रोपटे देऊन सत्कार करणेत आला यानंतर वर्षा देवी जगताप, हणमंत मुंजे, सुनिता कदम, ज्योती भोसले व विशाखा सांवत आदी शिक्षक शिक्षिकेचा सत्कार करणेत आला.
श्रीकांत दादा साेणवने प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत असताना म्हणाले की विद्यार्थ्यांना आपल्या गुरूचा आदर करायला हवा गुरूच जिवनाचे खरे मार्गदर्शक आहेत.
शफिक भाई इनामदार म्हणाले विद्यार्थ्यांच्या कलागुण ओळखून विद्यार्थ्यांना खरी दिशा देण्याचे काम हे शिक्षकच करू शकतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सताेष माेटे म्हणाले विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यात शिक्षकांचा मोठा योगदान आहे. पालकापेक्षाही शिक्षक जिवापाड आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रेम करून विद्यार्थी घडवत असतात त्यांना सर्वांनी सहकार्य करावे आणि शिक्षकांच्या कार्यास आमच्या शुभेच्छा.
सकाळची सुरुवात विधार्थ्यानी शालेय कामकाज चालविले विद्यार्थ्यांची भाषणे संपन्न झाली यावेळी मान्यवर उपस्थित होते
Comments
Post a Comment