जत तालुक्यातील अनेक प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने भव्य मोर्चा संपन्न- अध्यक्ष अमोल साबळे यांची माहिती

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- गुजरात राज्यातील गोध्रा येथील बहु चर्चित बिलकिस बानू बलात्कार व अत्याचार प्रकरणी गुजरात शासनाने त्या नराधम आरोपींना निर्दोष करून स्वातंत्र्य दिना दिवसी त्याचा पेडा भरवून सत्कार केला.हि घटना अतिशय निंदनीय आहे. तसेच राजस्थान येथे एका मागासवर्गीय मूलाने शिक्षकांना ठेवलेले पाणी पिले म्हणून त्या विद्यार्थ्यांला अमानूष मारहाण करून त्याचा खून केला अशा नालायक व सवर्ण औलादिच्या शिक्षकाला चाबकाचे फटके मारून भर चौकात फाशी देण्यात यावी. या व जत तालुक्यातील आनेक प्रश्ननासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता.         छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली यावेळेस सांगली जिल्हा सरचिटणीस श्रीकांत होवाळे सर, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पुजारी, महासचिव हरूनभाई इनामदार, वंचितचे नेते प्रशांत झेंडे (मास्तर) तालुका सरचिटणीस बाबासाहेब कांबळे, कार्याध्यक्ष हरीश सूर्यवंशी, राकेश कांबळे, त्रिमूर्ती  (पिंटू) कांबळे,ओबीसी संघटनेचे जत तालुकाध्यक्ष मुबारक नदाफ, डॉ शफिक इनामदार, हाजी हुजरे, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी सोलंनकर, समीर सत्ती, नजीर जमादार, बादशहा नदाफ, डॉक्टर इंडीकर, बशीर हैदराबादे, शकील मुल्ला, जब्बार मुल्ला, नजीर पटाईत, अनिल पवार, दीपक माघाडे, जनार्दन बिराजदार, सिराज शेख, दार्याप्पा जतकर, दीपक माघाडे, आदम इनामदार,सुरेश कोळी, वंचित बहुजन आघाडीचे महिला अध्यक्ष सौ. रुपाली शिंदे मॅडम,  यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.