राजे रामराव महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी 'दहा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाचे आयोजन!'

दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- राजे रामराव महाविद्यालय, जत येथे दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी ठीक 10.00 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. सुरेश एस. पाटील यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांसाठी आयोजित दहा दिवसीय उद्बोधन वर्गाचे उद्घाटन संपन्न झाले. 
    या उद्बोधन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील नवागत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रो.डॉ. सुरेश एस.पाटील म्हणाले की, "अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा दहा दिवसांचा उद्बोधन वर्गात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात कार्यरत असणारे सर्व विभाग व त्यांचे चालणारे कार्य यांची  वस्तुनिष्ठ माहिती दिली जाईल. महाविद्यालयात चालणाऱ्या अनेक विभागांच्या वतीने अनेक विद्यार्थी उपयोगी उपक्रम चालवले जातात. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होते. ते नुकसान होऊ नये हाच या उदबोधन वर्गाचा हेतू आहे. उदा. स्कॉलरशिपची योग्य माहिती नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.  त्याच बरोबर या उद्बोधन वर्गाच्या माध्यमातून स्वस्थ भारतीय समाजासाठी  चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कौशल्याधारित व मूल्यात्मक शिक्षणाची कास धरावी. श्रमाला प्रतिष्ठा असते आणि कोणतेही काम हे कमीपणाचे नसते." यावेळी  प्राचार्यांनी पुढील दहा दिवसांत होणाऱ्या विविध विभागातील कार्यक्रमाची क्रमशः माहिती देवून या उद्बोधन वर्गाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. भीमाशंकर डहाळके यांनी  तर आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. शिवाजी कुलाळ यांनी केले. सूत्रसंचालन दहा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाचे समन्वयक डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी केले.
   हा उद्बोधन वर्ग 16 सप्टेंबर पर्यंत चालणार असून यात 'राष्ट्रीय सेवा योजना', राष्ट्रीय छात्र सेना', 'स्पर्धा परीक्षा व व्यवसाय विषयक मार्गदर्शन', 'संशोधन नवनिर्मिती व अविष्कार स्पर्धा', 'केंद्र व राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजना', 'महिला सक्षमीकरण', 'सांकृतिक व क्रीडा उपक्रमाचे उच्च शिक्षणातील महत्व', 'सर्टिफिकेट व मूल्याधिष्ठित पाठ्यक्रम', 'ज्ञानस्रोत केंद्राचे उच्च शिक्षणातील महत्व', महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया' आदि विषयांवर विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
या उदबोधन वर्गात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश एस. पाटील यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन