माझावर टाकलेली जबाबदारी अत्यंत काळजीने पार पाडणार, सत्कारावेळी बोलतना अतुल कांबळे यांची ग्वाही.

दिव्यराज न्युज नेटवर्क :-(राजू ऐवळे) जत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच  मा.अतुल गिरमल कांबळे यांची बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल मेंढेगिरी गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अतुल कांबळे म्हणाले डाँ बाबासाहेब आंबेडकर व माहात्मा बसवेश्वेर यांच्या सारख्या महान गुरूनी जात भेद न मानता समाज एकत्र ठेवण्याचा काम केले परंतु काही विशिष्ट जातीचे लोक समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःचा पोट भरण्याचा काम करत आहे. आपण सर्वानी मिळून बहुजन समाज पार्टीच्या मध्यमातुन बहन मायावतीच्या नेतृत्वाखाली  समाज हिताच काम करू. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आला.   यावेळी मेंढेगिरीचे युवा नेते सुरेश पाटील, दुध डेअरीचे मालक कुमार जैन, राजू खनदाळे, पत्रकार राजू ऐवळे, अरूण सनदी, श्रीशैल बिरादार, बनाळीचे रविंद्र टेकाळे, शंकर माळी, महेश कांबळे, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.