राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी गुड्डापुर येथील सुपुत्राचा निवड.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जत तालुक्यातील गुड्डापुर गावचा सुपुत्र सोमनगौडा शंकर बिरादार याचे मथुरा उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या 19 वर्ष वयोगट मुलांच्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिरादार व सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव - विजय बिराजदार व गुड्डापूर चे युवा नेते धानापा आवटी व पालक शंकर बिरादार उपस्थित होते.
Comments
Post a Comment