जत तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई द्या :- अध्यक्ष सुनिल बागडे.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जत तालुक्यातील सततच्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तरी जत तालुक्यातील अनेक गावांना नुकसान भरपाईचे पंचनाम्यातून वगळण्यात आले आहे, सर्व सर्कलचा पंचनाम्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी प्रहार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
जत तालुक्यात सरासरी ५०५ मिमी पाऊस पडतो, परंतु यंदा आज पर्यंत सरासरी ५७० मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. पाऊस सतत पडत असल्या कारणाने शेतजमीन नापीक झाल्या आहेत, जमिनींना चीबड लागेलेले आहेत, पिकांची प्रचंड नुकसान झालेले आहेत, द्राक्षे, डाळिंब, केळी या फळबागांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे, पावसाच्या पाण्यामुळे शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण जत तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई देत २ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.